शेतकरी शेळीपालन अनुदान योजना | The Farmer Goat Farming Subsidy Scheme 2024 is an initiative to support farmers in establishing goat farming businesses

 शेतकरी शेळीपालन अनुदान योजना  | The Farmer Goat Farming Subsidy Scheme 2024 is an initiative to support farmers in establishing goat farming businesses


महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने ५० ते ७० टक्के सबसिडीच्या आधारावर शेळी व बोकड घेण्यासाठी अनुदान देण्याची तरतूद केली आहे. या योजनेचे स्वरूप, या योजनेत सहभागी होण्यासाठी काय अटी आहेत? या योजनेसाठी अर्ज कसा करावा याची माहिती आज आपण घेत आहोत.

Goat Husbandry Subsidy Scheme GR 2023-24 and other government schemes for goat farming शेळी पालन अनुदान योजना जीआर २०२३-२४:

राज्य सरकारने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगार निर्माण करण्यासाठी शेळी पालन अनुदान योजना सुरू केलेली आहे. या योजने अंतर्गत शेतकर्‍यांना २० शेळ्या आणि २ बोकड यासाठी ५०% अनुदान मिळणार आहे. या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया, सातारा आणि दुसर्‍या टप्प्यात बीड व भंडारा या सात जिल्हयांसाठी अनुदान दिले जाणार अशी तरतूद केली आहे. ज्या शेतकर्‍यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांना शेळ्या आणि बोकड या अनुदानावर देण्यात येणार आहेत. 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र हा शेती प्रधान देश आहे. शेती आणि त्यावर अवलंबून असणारे व्यवसाय हे महाराष्ट्रातील बहुतांश लोकांचे उत्पन्नाचे साधन आहे. मुंबईसारखी मोठी शहरे सोडल्यास ग्रामीण भागातील मुलांना रोजगारासाठी शेतीवरच अवलंबून राहावे लागते. पण शेती हा व्यवसाय म्हणजे त्याच्या उत्पन्नात चढ उतार आलेच. म्हणून अशा शेतकर्‍यांसाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्नात असते. शेती साठी पूरक उद्योगधंदे हाताशी असतील तर प्रत्येकाच्या हाताला काम आणि त्याबरोबर रोजगारही मिळेल. त्या दृष्टीने अशा योजना आणल्या गेल्या तर शेतकर्‍यांच्या भविष्यासाठी थोडी तरतूद करता येईल.  

The Farmer Goat Farming Subsidy Scheme is a government initiative aimed at promoting goat farming among farmers, particularly small and marginal farmers, to provide them with an additional source of income. Here are some key aspects of the scheme: शेतकरी शेळीपालन अनुदान योजनेचे स्वरूप :- 

१. या योजने अंतर्गत शेळी गटाची स्थापना करावी लागते त्यानंतर शेतकर्‍यांना वित्तीय संस्था अगर बँक कडून ५०% निधीचे कर्ज घेणे आवश्यक आहे. हे कर्ज घेतल्यानंतर शासना मार्फत कर्ज रक्कमेवर १ लाख १५ हजार याप्रमाणे अनुदान दिले जाते. 

२. या योजने अंतर्गत शेतकर्‍याला किंवा अर्जदाराला अशा प्रकारच्या शेळ्या आणि बोकड विकत घेणे क्रमप्राप्त आहे ज्या शेळ्या किंवा बोकड तेथील स्थानिक वातावरणात सामावून घेतील किंवा तग धरतील. म्हणून शेतकर्‍यांना संगमनेरी उस्मानाबादी प्रजातीच्या किंवा माडग्याल किंवा दक्खनी प्रजातीच्या मेंढया आणि बोकड असे वाटप करण्यात येईल.   

३. वरील पैकी कोणत्या जातीच्या मेंढया घ्यायच्या ही निवड मात्र त्या शेतकर्‍याची म्हणजेच त्या अर्जदारची राहील. 

४. या योजनेअंतर्गत जाती निहाय सबसिडी दिली जाईल अनुसूचीत जाती जमातींसाठी ७५% इतका हिस्सा हा राज्य शासनाचा असेल व बाकी २५% हिस्सा हा त्या अर्जदाराने स्वतः तरतूद करायचा आहे. त्यासाठी तो बॅंककडून कर्ज स्वरुपात रक्कम घेऊ शकतो. 

५. खुल्या वर्गासाठी आणि इतर मागास वर्गीयांसाठी ५०% इतके अनुदान राहील आणि बाकी उर्वरित रक्कम ही त्या त्या अर्जदाराने स्वतः तरतूद करायची आहे. त्यासाठी तो अर्जदार बॅंककडून कर्ज स्वरुपात रक्कम घेऊ शकतो.

६. ज्या शेळ्या किंवा मेंढया खरेदी केल्या जातील त्याचा वाहतूक खर्च हा त्या अर्जदाराला स्वतः करावयाचा आहे. त्या वाहतूक खर्चाची तरतूद या अनुदान योजनेत नाही. याची अर्जदाराने नोंद घ्यावी. 

७. या योजने अंतर्गत अर्जदार शेतकर्‍याला विकत घेतलेल्या शेळ्या मेंढ्यांचे रोजचे लागणारे खर्चे, त्यांच्या औषध पाण्याचा खर्च हा स्वतः करायचा आहे. ती सोय या योजनेत नाही. 

Here are the eligibility criteria for participation under the Goat Farming Subsidy Scheme 2024: शेळीपालन अनुदान योजने अंतर्गत सहभागी होण्यासाठी पात्रता :-

१. दारिद्र्य रेषेखालील शेतकरी किंवा उमेदवार. 

२. महिला बचत गटातील महिला 

३. अल्पवाचल्प, अल्प भूधारक शेतकरी

४. सुशिक्षित बेरोजगार (ज्यांची नोंदणी रोजगार स्वयं रोजगार केंद्रात नमूद आहे)

Here are the documents typically required for the Goat Farming Subsidy Scheme: शेळीपालन अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-

१. अर्जदाराला किंवा शेतकर्‍याला त्यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेत आपले स्वतःचे बॅंक खाते उघडणे अपरिहार्य आहे. जर त्या अर्जदाराचे खाते या आधीच राष्ट्रीयकृत बँकेत उघडलेले असेल तर त्याला ते खाते या योजनेशी जोडणे आवश्यक आहे. कारण या योजने अंतर्गत मिळणारे अनुदान हे त्या अर्जदारच्या बँकेत हस्तांतरित केले जाणार आहे.  

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

२. अर्जदार शेतकर्‍याचे बँक खाते हे आधारकार्ड आणि पॅनकार्ड सोबत लिंक असले पाहिजे.

३. अर्जदार शेतकर्‍याने ज्या शेळ्या किंवा मेंढ्यांची निवड केलेली आहे त्या तेथील वातावरणाशी तग धरून म्हणजेच त्या वातावरणात समवून घेणार्‍या हव्यात.

४. अर्जदाराला जर अनुसूचीत जाती जमाती खाली जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या अर्जदाराला तसे जाती विषयक प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

५. अर्जदार हा दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्याला तसा दाखला देणे बंधनकारक आहे.

६. अर्जदाराचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बँकेचे बँक खाते असणे आवश्यक आहे. 

७. अर्जदाराचे शेळी मेंढी पाळणाचे प्रशिक्षण घेतलेले प्रमाणपत्र 

८. घरपट्टी, विजेचे बिल 

९. रेशनकार्ड

१०. पासपोर्ट साइज फोटो 

शेळीपालन अनुदान योजनेच्या विहित नमुन्यातील अटी व नियम:

१. अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील असावा. 

२. अर्जदार शेतकर्‍याने जर या आधी कोणत्याही शेळी मनधि पालन योजनेचा लाभ घेतला असेल तर तो या योजनेतून बाद होईल

३. एका कुटुंबातील एकच व्यक्ति या योजनेसाठी पात्र होऊ शकते. 

४. अर्जदार शेतकर्‍याच्या नावावर स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.

५. अर्जदार शेतकरी हा सज्ञान असाल पाहिजे.

६. अर्जदाराने शेळी मेंढी पळणाचे प्रशिक्षण घेतलेले असले पाहिजे. 

अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करावा लागेल आणि आपल्या सगळ्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी. त्यानंतर तो अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात अथवा जिल्हा कार्यालयात जमा करायचा आहे.


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

YR Thakur

designer, I can give you a Blogger website by designing a professional website and if you want to see what website I design, click on this link. click here website demo

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने