चिंता सोडा सिबिल स्कोअर वाढवा. सिबिल स्कोअर वाढवण्याचे जबरदस्त उपाय | Increase Your Civil Score And Get Loan Online|
कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही CIBIL स्कोअरबद्दल ऐकलं असेल. कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचा CIBIL स्कोअर कसा आहे, हे तपासून पाहतात. पण अनेकांना CIBIL स्कोअरबद्दल फारशी माहिती नसते. जेव्हा तुम्ही कर्ज घेण्यासाठी बँकेकडे किंवा वित्तीय संस्थेकडे जाता, तेव्हा तुम्हाला त्याचं खरं महत्त्व कळतं. आज आपण समजून घेऊया CIBIL स्कोअर म्हणजे नक्की काय आणि तो सुधारण्यासाठी कोणते उपाय करता येतील.What exactly is CIBIL score and what measures can be taken to improve it.
CIBIL स्कोअर म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व?What is CIBIL score and its importance?
CIBIL (Credit Information Bureau India Limited) हा भारतातील प्रमुख क्रेडिट ब्युरो आहे. तो प्रत्येक व्यक्तीची क्रेडिट हिस्ट्री आणिक्रेडिट स्कोअर ट्रॅक करतो. हा स्कोअर 300 ते 900 च्या घरात असतो. ह्यातून 750 किंवा त्यापेक्षा जास्त स्कोअर असेल, तर बँका आणि वित्तीय संस्था तुमचं कर्ज पटकन मंजूर करतात. कमी स्कोअर असेल, तर कर्ज मंजुरीसाठी अडथळे येतात .
मोबाईल वरून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा
आणि व्याजदरही जास्त लागतो. म्हणजे तुम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला कर्ज मिळेल किंवा न मिळेल हे तुमच्या क्रेडिट स्कोअर वर म्हणजेच सिबिल स्कोअर वर अवलंबून असतात.
CIBIL स्कोअर मोफत ऑनलाइन कसा Father's How to check CIBIL score online for free?
तुमचा सिबील स्कोअर ऑनलाईन चेक करणं अतिशय सोपं आहे.
1. CIBIL ची अधिकृत वेबसाइट (www.cibil.com) उघडा.
2. नवीन खाते तयार करा किंवा लॉगिन करा.
3. PAN Card, Mobile Number, DOB आणि Email ID टाका.
4. OTP व्हेरिफाय करून तुमचा CIBIL स्कोअर मिळवा.
5. अनेक बँका आणि NBFC कंपन्या देखील मोफत CIBIL स्कोअर चेक करण्याची सुविधा देतात.
Low CIBIL Score सुधारण्यासाठी 7 सोपे आणि प्रभावी उपाय. How to improve CIBIL score?
मित्रांनो, तुमचा सिबिल स्कोअर जर कमी असेल तर तुम्हाला बँकेकडून कर्ज मंजुरी पटकन मिळत नाही. आणि कर्ज न मिळाल्यामुळे तुमची भविष्यातील कामं अडू शकतात. त्यासाठी सिबिल स्कोअर कसा सुधारायचा How to improve CIBIL scoreआहे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे त्यासाठी खालील उपाय लक्षात घ्या.
1. वेळेवर EMI आणि क्रेडिट कार्ड बिल भरा
प्रत्येक हफ्ता आणि बिल वेळेत भरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उशिरा भरलेल्या देयकांमुळे तुमच्या स्कोअरवर वाईट परिणाम होतो.
Auto-Pay Setup करा, त्यामुळे तुमचं बिल वेळेवर भरलं जाईल आणि उशिराच्या दंडापासून सुटका मिळेल.
2. खूप साऱ्या कर्जांसाठी अर्ज करणं टाळा
एकाच वेळी अनेक कर्जांसाठी अर्ज केल्यास बँका तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अस्थिर समजतात, त्यामुळे स्कोअर कमी होऊ शकतो.
मोबाईल वरून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा
जर तुम्हाला कर्जाची गरज असेल, तर योग्य प्लॅनिंग करून अर्ज करा.
3. क्रेडिट कार्डची मर्यादा पूर्णपणे वापरणं टाळा
Credit Utilization Ratio 30% पेक्षा कमी ठेवा. म्हणजेच ₹1,00,000 लिमिट असेल, तर ₹30,000 पेक्षा जास्त वापर टाळा.
कार्ड वापरण्याच्या सवयी सुधारल्या तर स्कोअरही हळूहळू सुधारेल.
4. CIBIL Report मधील चुका तपासा आणि सुधारणा करा
कधी कधी बँकांकडून चुकीची माहिती क्रेडिट रिपोर्टमध्ये समाविष्ट होते. त्यामुळे तुमच्या स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो.
तुम्ही CIBIL Dispute Resolution द्वारे या चुकांची दुरुस्ती करू शकता.
वेळोवेळी तुमचा CIBIL स्कोअर आणि रिपोर्ट तपासणं महत्त्वाचं आहे.
5.Loan Settlement टाळा
कर्जाचे हफ्ते वेळेवर न भरल्यामुळे बँका तुमचं कर्ज Write-Off किंवा Settlement म्हणून दाखवतात, त्यामुळे स्कोअर घटतो.
शक्य असेल तर संपूर्ण कर्ज फेडा, कारण Loan Settlement केल्यास भविष्यात मोठ्या कर्जासाठी अडचण येऊ शकते.
6. क्रेडिट मिक्स संतुलित ठेवा
फक्त Personal Loan न घेता Home Loan, Car Loan आणि Credit Card यांचा योग्य वापर करा.
विविध प्रकारचे क्रेडिट असतील, तर तुमचा क्रेडिट स्कोअर अधिक स्थिर राहील.
7. नियमित क्रेडिट स्कोअर तपासा
तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये बदल होत आहेत का, हे जाणून घेण्यासाठी दर 3-6 महिन्यांनी तो तपासा.
यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक आरोग्याचा अंदाज येईल आणि वेळेवर सुधारणा करता येईल.
CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी किती वेळ लागतो?
जर तुम्ही वरील सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळल्या, तर 6-12 महिन्यांत स्कोअर सुधारतो.
मात्र, हे सततच्या आर्थिक शिस्तीवर अवलंबून आहे. जर तुम्ही वेळेवर EMI भरले, क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने वापरले, आणि CIBIL रिपोर्ट दुरुस्त केला, तर स्कोअर जलद सुधारेल.
मोबाईल वरून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा
तर मित्रांनो, चांगला CIBIL Score असणे तुमच्या आर्थिक स्थिरतेसाठी आणि भविष्यकालीन आर्थिक नियोजनासाठी महत्त्वाचं आहे.
जर तुम्हाला Loan Apply करायचं असेल किंवा Credit Card Approval हवा असेल, तर तुमचा स्कोअर 750+ असावा.
जर तुमचा स्कोअर कमी असेल, तर वरील उपायांचा अवलंब करा आणि तुमची आर्थिक योग्यता वाढवा!
What exactly is CIBIL score and what measures can be taken to improve it.
योग्य आर्थिक सवयी ठेवून तुमचा CIBIL स्कोअर दीर्घकाळ चांगला राहील.