सुकन्या समृद्धी योजना: मुलींच्या भविष्याची सुरक्षितता | Sukanya Samruddhi Yojana 2025 |
सुकन्या समृद्धी योजना किंवा सुकन्या समृद्धी खाते ही भारत सरकारची नवजात कन्यांच्या पालकासाठी राबविली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी पैसे जमा करण्यासाठी पाठबळ देणे हा आहे. ही योजना २२ जानेवारी २०१५ रोजी चालू झाली. या योजनेसाठी करामध्ये सूट मिळणार आहे. या योजनेचे खाते हे तुम्ही पोस्ट खात्यात किंवा डाकघर किंवा कोणत्याही अधिकृत बँक मध्ये उघडले जाऊ शकते.
Sukanya Samruddhi Yojana 2025
Sukanya Samruddhi Yojana 2025 सुकन्या समृद्धी योजना वैशिष्ट्ये :-
कोणत्या मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात?
१) या योजनेअंतर्गत ज्या मुलींचे वय हे १० वर्षे किंवा त्याहून कमी आहे त्या मुलींचे पालक मुलीच्या नावे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसात 'सुकन्या समृद्धी' खाते उघडू शकतात, यात किमान १०००रु. ठेवावे लागतात. एका आर्थिक वर्षात या खात्यात कमाल १.५ लाख रु टाकता येतात.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
२) या योजने अंतर्गत खाते उघडल्यानंतर २१ वर्षापर्यंत किंवा मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न करावयाचे असल्यास (जी मुदत आधी असेल ती) व्याजासह ठेव परत मिळते.
३) १८ वर्षे वयानंतर शिक्षणासाठी ५०% रक्कम काढण्याची मुदत असते. उर्वरित रक्कम पुढे केव्हाही (२१ वर्षे मुदत संपेपर्यंत) काढता येईल.
Sukanya Samruddhi Yojana 2025
सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष:-
लागू असलेले पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत-
• सुकन्या समृद्धी योजनेतील खातेधारक मुलगी ही वयवर्षे १० वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
• या योजने अंतर्गत फक्त जैविक पालक/कायदेशीर पालकांनाच खाते उघडण्याचा अधिकार आहे.
• मुलगी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि खाते सांपे पर्यंत ती भारतातच राहत असली पाहिजे.
• एका मुलीच्या नावावर फक्त १ खाते उघडता येते.
• या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभाचा लाभ प्रत्येक कुटुंबातील २ मुली घेऊ शकतात.
• जुळ्या/तिघांच्या बाबतीत एक कुटुंब जास्तीत जास्त ३ सुकन्या समृद्धी योजना खाती उघडू शकतात Sukanya Samruddhi Yojana 2025
सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे:-
• सुकन्या समृद्धी योजनेसाठी ज्या मुलीचा अर्ज करावयाचा आहे त्या मुलीचा जन्म दाखला/वयाचा पुरावा आवश्यक आहे.
• पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहेत.
• ओळखपत्र आणि निवासी पुरावा (उदा. आधार कार्ड , मतदार ओळखपत्र, पासपोर्ट इ.) आवश्यक आहे.
• सुकन्या समृद्धी योजनेच्या खातेदाराचा मुलीशी असलेल्या नात्याचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र/न्यायालयीन आदेश/दत्तक प्रमाणपत्र)
• खातेधारकाच्या पत्त्याचा पुरावा (बँक स्टेटमेंट/भाडे करार/उपयोगिता बिल, इ.) Sukanya Samruddhi Yojana 2025
सुकन्या समृद्धी योजनेत (एसएसवाय (SSY)) गुंतवणूक कशी करावी?
• सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा अधिसूचित शेड्युल्ड कमर्शियल बँकेत (एससीबी (SCB)) खाते उघडले पाहिजे. खाते उघडण्यासाठी तुम्हाला खालील सूचनाचे पालन केले पाहिजे.
• तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा अधिसूचित बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागेल.
• तिथे जाऊन तुम्हाला सुकन्या समृद्धी खाते उघडण्याच्या फॉर्म भरावा लागेल. (फॉर्म-1).
• सदर फॉर्म भरून झाल्यावर सर्व आवश्यक कागद पत्रे त्या फॉर्म सोबत जोडून तो फॉर्म तुम्हाला संबंधित बँकेत किंवा पोस्ट खात्यात जमा करावा लागेल.
• खाते उघडल्यावर त्यात तुम्हाला पैसे डिपॉझिट करावे लागतील. तुम्ही कॅश, डिमांड ड्राफ्ट किंवा चेकद्वारे पेमेंट करू शकता.
• बस एवढेच. एकदा तुम्ही पैसे डिपॉझिट केले की त्या नंतर, बँक किंवा पोस्ट ऑफिस तुमच्या खाते उघडण्याच्या विनंतीवर प्रक्रिया करेल आणि तुम्हाला नव्याने उघडलेल्या खात्याचे तपशील असलेले पासबुक मिळेल. Sukanya Samruddhi Yojana 2025