कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोर का महत्वाचा असतो | Why is CIBIL score important for taking a Loan |
कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोर का महत्वाचा असतो व ऑनलाइन सिबिल स्कोर कसा चेक करायचा
तुम्हाला जर कर्ज घ्यायचे असेल तर कोणतीही बँक ही तुमचे (CIBIL SCORE) सिबिल स्कोअर चेक करते. सिबिल स्कोअर हा बँकेतून कर्ज घेण्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला नसेल तर बँका या तुम्हाला कर्ज देणे नाकारू शकतात. आता हा सिबिल स्कोअर म्हणजे काय? कर्ज घेण्यासाठी आपला सिबिल स्कोअर महत्वाचा का असतो? याची माहिती आपण या लेखात घेत आहोत.
सिबिल स्कोर (CIBIL SCORE) म्हणजे काय?
सिबिल (CIBIL) याचा अर्थ क्रेडिट इन्फर्मेशन ब्यूरो (इंडिया) लिमिटेड असा आहे यालाच क्रेडिट स्कोअर असेही म्हटले जाते. ही एक क्रेडिट माहिती कंपनी आहे. या कंपनीचे काम हे व्यक्ति आणि कंपन्यांचा आर्थिक डाटा मिळविणे, रेकॉर्ड करणे आणि तो राखून ठेवणे (save) असा आहे. सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर हा त्या व्यक्तीची क्रेडिट पात्रता दाखवून देतो.
मोबाईल वरून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा
एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतले असेल किंवा कोणत्याही प्रकारचे क्रेडिट घेतले असेल (Credit Card) तर त्या व्यक्तीने त्या कर्जाचे किंवा क्रेडिट घेतलेल्या रक्कमेचे व्यवस्थापन आणि त्याची परतफेड कशी केली? या परतफेडीची क्षमता कशा पद्धतीची आहे यावरच त्या व्यक्तीचा सिबिल (CIBIL) स्कोअर ठरविला जातो. सिबिल स्कोअर ठरविताना तुमचे क्रेडिटकार्डचे बिल भरण्याची हिस्टरी, सध्या तुम्ही कोणत्या बँकेचे कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाची मुदत व परतफेडीचे व्यवस्थापन, इतर ठिकाणी कुठे कर्जसाठी अर्ज केला आहे का? या सर्वांवर तुमचा सिबिल स्कोअर ठरतो. आणि या सिबिल स्कोअरवरच त्या कर्जदारला कर्ज मिळेल की नाही हे ठरवले जाते. सिबिल स्कोअरची श्रेणी ही ३०० ते ९०० अशी आहे. तुमची सिबिल स्कोअरची श्रेणी जेवढी उच्च, तेवढा तुमचा सिबिल स्कोअर उत्तम. म्हणजेच तुम्ही कर्ज मिळण्यास पात्र अर्जदार तहरू शकता.
सिबिल (CIBIL) स्कोअरची श्रेणी :-
सिबिल स्कोअरची श्रेणी ही ३०० ते ९०० अशी आहे. जितके सिबिल स्कोअर चांगले किंवा ज्याची सिबिल स्कोअरची श्रेणी उच्च तेवढे क्रेडिट रेटिंग चांगले. साधारणपणे ७५० पेक्षा जास्त सिबिल स्कोअर ज्याचा असेल तो कर्ज घेण्यास पात्र उमेदवार असतो.
हे ही लक्षात घेणे महत्वाचे आहे की कर्ज(Loan) किंवा क्रेडिटसाठी अर्ज करणार्या ऊमेदवाराची कर्जाची आवश्यकता तपासणे महत्वाचे आहे.
आजमितीला कर्ज किंवा क्रेडिट मिळविण्यासाठी तुमच्या क्षमतेवर तुमचं स्कोअर कशा प्रकारे परिणाम करते हे समजून घेणे गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपले सिबिल (CIBIL) किंवा क्रेडिट स्कोअर समजणे महत्वाचे आहे. आणि तो सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी काय पावले उचलणे गरजेचे आहे त्याची माहिती आपण घेऊ.
Improving your CIBIL score requires a combination of financial discipline and smart credit management strategies. Here are some tips to help you improve your CIBIL score. सिबिल (CIBIL) स्कोअर कसा सुधारायचा?
सिबिल (CIBIL) स्कोअर सुधारणे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते.
१. अर्जदाराने या आधी कर्ज घेतले असेल तर त्याची परतफेड दिलेल्या मुदतीत करावी.
२. घेतलेल्या कर्जाचे हफ्ते थकवू नयेत. असे केल्यास त्याचा आपल्या सिबिल स्कोअरवर परिणाम होऊ शकतो.
३. क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले पाहिजे आणि क्रेडिट कार्डचा वापर कमी केला पाहिजे.
४. एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डचा वापर करणे शक्यतो टाळावे.
या सर्व नियमानांचा वापर जर आपण केला तर आपला सिबिल स्कोअर वाढू शकतो.
सिबिल (CIBIL) स्कोअर कसा तपासायचा? (Check your online CIBIL Score) :-
१. सिबिल स्कोअर Online तपासण्यासाठी क्रेडिट मोनिटेरिंग सर्विस Credit Monitoring Service मध्ये साईन अप करणे.
२. यात तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्टचा अॅक्सेस मिळेल. यात तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट पहायला मिळेल.
३. यात तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी केली?, तुम्ही जर क्रेडिट कार्डचा वापर करीत असाल तर त्याचे बिल तुम्ही कशा प्र सिबिल (CIBIL) स्कोअर प्रकारे आणि किती मुदतीत भरता? याचा तुमच्या सिबिल स्कोअरवर काय परिणाम होतो हे ही स्पष्ट होईल.
मोबाईल वरून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा
अशा प्रकारे आपले सिबिल स्कोअर कसे कॅल्क्युलेट केले जाते आणि पेमेंट रेकॉर्ड आणि क्रेडिट वापर यासारखे विविध घटक त्यांच्या लोन किंवा इतर प्रकारच्या क्रेडिट मिळविण्याच्या क्षमतेवर कसे परिणाम करतात हे समजून घेणे आवश्यक आहे. वर नमूद केलेल्या गोष्टींचे अनुसरण करून, व्यक्ती सहजपणे आपला सिबिल स्कोअर राखू शकतात,
How to check CIBIL score online? ऑनलाइन सिबिल स्कोर चेक बेस्ट ऑप्शन कोणकोणते आहेत?
१. वर्षातून एकदा तुम्ही सिबिल स्कोअर च्या वेबसाइट वर सिबिल स्कोर विनामूल्य चेक करू शकता.
२. पण जर तुम्हाला पुन्हा त्याच वर्षी सिबिल स्कोअर चेक करायचं असल्यास मात्र तुम्हाला त्याचे सब्स्क्रीप्शन घ्यावे लागेल.
३. तुम्ही एक्सपेरियन, CRIF हाय मार्क आणि इक्विफॅक्स सारख्या इतर क्रेडिट ब्युरोमधून तुमचे क्रेडिट स्कोअर तपासू शकता, निरीक्षण करू शकता॰
४. Paisabazaar.com (वेब आणि ॲप) द्वारे तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर तपासू शकता आणि CIBIL सह एकाहून अधिक ब्युरोमधून, त्वरित आणि पूर्णपणे विनामूल्य तपासू शकता. ही एक डिजिटल झटपट प्रक्रिया असल्याने, तुम्ही तुमचा नवीनतम क्रेडिट स्कोअर काही सेकंदात कुठूनही, कधीही विनामूल्य मिळवू शकता. How to check CIBIL score online