दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर होणार कसा आणि कुठे पाहाल SSC Exam result 2025

 दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर होणार कसा आणि कुठे पाहाल SSC Exam result 2025


ह्या लेखातून झटपट वाचा….दहावीचा निकाल कुठे बघायचा आणि निकाला संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती.


आज दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा लेख अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कारण गेल्या दोन महिन्यांपासून दहावी बारावीच्या निकालाची चर्चा सुरु होती. बारावीचा निकाल लागल्यावर दहावीवाल्यांचा जीव आणखी टांगणीला लागला होता.

आज निकाल लागत असल्यामुळे राज्यभरात १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे लक्ष मोबाईल आणि वेबसाईट्सकडे लागले आहे. 

आज किती वाजता निकाल बघायचा?

हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या मनात घोळत होता. अखेर ही प्रतीक्षा संपणार आहे.

आज, १३ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करणार आहे.


निकाल लगेच कुठे पाहता येईल 


तुमचा दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही खालील वेबसाईट्सपैकी कोणतीही वापरू शकता.

 [mahresult.nic.in]

(https://mahresult.nic.in)

[mahahsscboard.in]

(https://mahahsscboard.in)

[digilocker.gov.in]

(https://digilocker.gov.in

[msbshse.co.in]


दहावीचा निकाल पाहायचा कसा? स्टेप बाय स्टेप समजून घ्या.


1. वरीलपैकी कोणतीही वेबसाईट उघडा

2. "SSC Result 2025" लिंकवर क्लिक करा

3. तुमचा Seat Number आणि आईचं नाव टाका

4. तुमचा निकाल गुणांसह स्क्रीनवर दिसेल

5. तो डाऊनलोड करून ठेवा. पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी उपयोगी पडेल!

यंदा दहावीच्या परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते?

 किती जण भाग्यवान ठरणार?


तर परीक्षा झाली होती २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान. ह्यात परीक्षार्थी एकूण १६.११ लाख विद्यार्थी विद्यार्थिनी होत्या. यामध्ये ८.६ लाख मुले, ७.४७ लाख मुली आणि १९ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता.

राज्यातील ९ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, लातूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण विभागातून आजचा निकाल जाहीर होणार आहे. बघू कुठला विभाग बाजी मारतो.

आज सकाळी ११ वाजता काय होणार?

दुपारी निकाल जाहीर होण्यापूर्वी, शिक्षण मंडळ सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाची आकडेवारी म्हणजेच एकूण टक्केवारी, विभागनिहाय यशवंत वगैरे माहिती देणार आहे.

कोणत्या विभागात सर्वाधिक यश? किती विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक गुण? याची उत्सुकता सर्वांना असेलच!


पण लक्षात ठेवा निकालाच्या पलीकडचं सत्य!


गुण मिळवणं महत्त्वाचं आहेच, पण यशाचं मोजमाप केवळ मार्कशीटवरून होऊ शकत नाही. काही वेळा अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यास निराश होणं स्वाभाविक आहे. पण तुमचं मूल्य त्या एका कागदावर ठरत नाही.

तुमच्यात काय क्षमता आहे हे पुढचं शिक्षण, निर्णय आणि मेहनत ठरवतील.


सर्व मित्रांसाठी खास शुभेच्छा!


मित्रांनो तुम्ही यशस्वी व्हालच हे सांगायला मार्कशीटची गरज नाही. पण आजचा निकाल तुम्हाला पुढच्या पायरीसाठी दिशा देईल, यामध्ये शंका नाही.

तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या मेहनतीला सलाम!

तुमच्या स्वप्नांना भरारी मिळो. ऑल द बेस्ट!

YR Thakur

designer, I can give you a Blogger website by designing a professional website and if you want to see what website I design, click on this link. click here website demo

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने