Gai Gotha Anudan Yojana: गाय-म्हैस पालनासाठी ₹2.25 लाख अनुदान! पात्रता आणि आवश्यक कागदपत्र ही
मंडळी, पावसाळा तोंडावर आल्यावर आपण हाच विचार करतो. माझ्या गायींसाठी जनावरांसाठी पक्क्या गोठ्याचं काहीतरी करता येईल का? पावसाळा आला की गोठ्यात पाणी साचतं, गायी म्हशी आजारी पडतात.
कधी एकदा सरकार काहीतरी मदत करणार?
जर हीच समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर आता काळजी करू नका. कारण महाराष्ट्र सरकारने गाय गोठा अनुदान योजना 2025 सुरू केली आहे, जी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत घेऊन आली आहे.
गाय गोठा अनुदान योजना 2025 मध्ये गाय-म्हैस गोठा बांधण्यासाठी सरकार ₹2.25 लाख अनुदान देत आहे. पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे ह्यांची माहिती घ्या आणि लगेच अर्ज करा.
तुम्ही पात्र असाल तर अजिबात वेळ गमावू नका. आजच mahaegs.maharashtra.gov.in वर जाऊन अर्ज करा आणि तुमच्या पशुपालनाचा व्यवसाय उंचावा!
गाय गोठा अनुदान योजना 2025 मधून काय मिळेल?
योजनेतून किती अनुदान मिळेल?
शासनाने जनावरांच्या संख्येनुसार अनुदानाची रक्कम ठरवली आहे:
२ ते ६ जनावरांसाठी गोठा बांधणीसाठी ₹77,188
६ ते १२ जनावरांसाठी ₹1,54,000
१८ किंवा त्यापेक्षा जास्त जनावरांसाठी ₹2,32,000 पर्यंत
हे अनुदान गोठा बांधण्याच्या खर्चाचा मोठा भाग सरकार देते.
मोबाईल वरून अर्ज करण्याची येथे क्लिक करा
आपला गोठा कसा असावा ह्याचे सरकारी नियम -
२ ते ६ जनावरांसाठी गोठा = २६.९५ चौ.मी. क्षेत्रफळ, लांबी ७.७० मीटर, रुंदी ३.५० मीटर
गव्हाण आकार = ७.७ मी × २.२ मी × ०.६५ मी
मुत्रसंचय टाकी = २५० लिटर क्षमतेची
पिण्याच्या पाण्यासाठी टाकी = २०० लिटर
सरकारने यासाठी ठराविक मापदंड ठेवले आहेत, ज्यामुळे जनावरांना आरामदायक आणि सुरक्षित वातावरण मिळेल.
गाय गोठा योजना 2025 पात्रता. कोण अर्ज करू शकतो?
ही योजना खास करून खालील प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे.
महिलाप्रधान शेतकरी कुटुंब
भूसुधार योजना लाभार्थी
अल्पभूधारक शेतकरी
अनुसूचित जाती / जमातीचे शेतकरी
भटक्या विमुक्त जमातीतील शेतकरी
दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
मोबाईल वरून अर्ज करण्याची येथे क्लिक करा
योजनेसाठी महत्त्वाच्या अटी आणि शर्ती काय आहेत -
२० ते ५० फळझाडे लावल्यास छतविरहित गोठा बांधण्यास पात्रता
५० पेक्षा जास्त फळझाडे असल्यास छत असलेल्या गोठ्यास पात्रता
किमान १०० दिवस सार्वजनिक कामाचा पुरावा आवश्यक (नरेगा प्रमाणपत्र)
२ ते ६ जनावरांची संख्या बंधनकारक
पशुधन अधिकाऱ्याचा प्रमाणपत्र अनिवार्य
७/१२ उतारा, ८ अ उतारा, रहिवासी प्रमाणपत्र आणि बँक खाते असणे गरजेचे
ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र आवश्यक
अर्जासाठी आवश्यक कागदपत्र
ओळख आणि रहिवासी कागदपत्र (आधार कार्ड, रहिवासी दाखला)
जातीय दाखला (जर लागू असेल तर)
७/१२ उतारा व ८ अ उतारा (शेतजमिनीचा पुरावा)
जनावरांचे टॅगिंग प्रमाणपत्र
नरेगा ओळखपत्र किंवा १०० दिवस कामाचा पुरावा
राष्ट्रीयकृत बँकेत खाते तपशील
ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र
पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, ईमेल आयडी
अर्ज मंजूर झाल्यानंतर काय करायचं?
मंजुरीनंतर खालील फोटो वेळेत जमा करणे आवश्यक आहे:
काम सुरू होण्यापूर्वीची जागेची फोटो
बांधकाम सुरू असताना गोठ्याचा फोटो
काम पूर्ण झाल्यावर शेतकरी व अधिकृत बोर्डचा फोटो
हे फोटो ७ दिवसांत जमा करणे बंधनकारक आहे, नाहीतर अनुदानात अडचण येऊ शकते.
मोबाईल वरून अर्ज करण्याची येथे क्लिक करा
जर तुम्हाला तुमच्या गायींसाठी पक्क्या आणि सुरक्षित गोठ्याची गरज असेल, तर गाय गोठा अनुदान योजना 2025 ही चांगली संधी आहे.
ह्यामुळे पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या सगळ्या ऋतूंमध्ये तुमच्या पशूंचा योग्य सांभाळ होईल आणि दूध उत्पादनातही वाढ होईल.